भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी

Monday, June 25, 2018

औरंगाबाद: औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. 

एका आमदाराचा लवकरच खून करणार असे सांगत पंतप्रधान मोदीबाबत सुद्धा या पोस्टमध्ये अपशब्द लिहण्यात आले आहेत. धमकी देणारा हा माणूस युवक काँग्रेसचा माजी जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगण्यात येतंय, या धमकी बाबत जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment