माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या कैलास स्मृती’वर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग, तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ, जिल्हाउपाध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, कंधार तालुकाध्यक्ष माधवराव पाडांगळे, जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, शहाजी नळगे, उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, युवक कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्ष युवराज वाघमारे, मौलाना अकबर, नगरसेवक पंकज परिहार, युनुस शेख, पिनु चुडावकर, ऑड.के.एम पवार, शिवाजी आंबेकर, सचिन रहाटकर, अजीमोद्दिन शेख, अप्पाराव चव्हाण, मुद्खेडेच माजी नगराध्यक्ष सुनील शेटे, यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी लोहा नगरपालिकेची निवडणूक पूर्वतयारीने लढवू त्यासाठी आता पासूनच कामाला लागा असे सांगू या मतदार संघात २००९ ची पुनरावृत्ती करायची आहे. दारू पैसे यावरच निवडणुका होतात असे सांगताना राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार विरोधात जनरोष आहे. त्याचा फायदा आपल्याला उढवता आला पाहिजे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी करा असे मार्गदर्शन केले. लोहा शहरातील चार प्रभागासाठी आ. राजूरकर यांच्या फंडातून चाळीस लक्ष रुपये देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. प्रास्ताविक माजी आ. रोहिदास चव्हाण यांनी केले. तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ आ. अमरनाथ राजूरकर याची भाषणे झाली.
बैठकी पूर्वी माजी नगराध्यक्षकल्याणराव सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव यांचे स्वागत केले तर युथ कॉग्रेसचे अध्यक्ष युवराज वाघमारे यांनी त्यांच्या दुकानासमोर स्वागत केले.

No comments:
Post a Comment