वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ३० टक्के पाऊस

Monday, June 25, 2018

लातूर: प्रतिनिधी
यंदाच्या मोसमात वरुणराजा चांगलाच बरसत असल्याने बळीराजासह सर्वसामान्य जनता सुखावली आहे. लातूर जिल्ह्यात दि.२४ जून अखेर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाऊस्मान योग्य वेळी आणि पुरेसा असल्याने शेतीकामांना गती आली आहे.

लातूर जिल्ह्याचे एकूण वार्षिक पर्जन्यमान ८०१.१३ मि.मी. इतके आहे. तुलनेत दि.२४ जून अखेर जिल्ह्यात २४२.०८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.अर्थात ३० टक्के पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३५३.३३ मि.मी. पाऊस शिरुर अनंतपाळ तालुक्यात झाला आहे. जिल्ह्याचे पर्जन्यमान पुढीलप्रमाणे. लातूर २१०.१८, औसा २०४.१५, रेणापूर २३५, अहमदपूर २०३.४९, चाकूर ३४६, उदगीर २०९, जळकोट १३६, निलंगा २७३, देवणी २४९.६७ आणि शिरुर अनंतपाळ ३५३.३३ मि.मी.आजपर्यंत अपेक्षित पावसाशी प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी २१९.८८ टक्के आहे. मागच्या अनेक वर्षातील २५ जून पर्यंत पर्जन्यमानाची आकडेवारी पाहता यावर्षी खूपच समाधानकारक पाऊस झाला आहे.

यंदा सलामीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी, व्यापारी, राजकारण मंडळींसह सर्वसामान्य माणसाच्या चेहर्‍यावर हास्य ङ्गु लले आहे. कारण भारत कृषीप्रधान देश आहे. पाऊस चांगला होवून शेतीमाल चांगला पिकला तरच अर्थव्यवस्था मजबूत होते. दमदार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात दि.९ जून पर्यंत आलेल्या पावसानंतर अनेक शेतकर्‍यांनी पेरणी अटोपली होती. मागच्या दोन दिवसात झालेल्या समाधानकारक पावसानंतर त्या पिकांना जीवदान मिळाले असून उर्वरित शेतकरी आता पेरणीची कामे हाती घेतील. चालू वर्षी वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment