दुसर्‍या दिवशी नऊ व्यापार्‍याकडुन ४५ हजार वसुल

Monday, June 25, 2018

मनपाची कॅरीबॅग विरुद्ध धडक मोहीम सुरुच;सुटीच्या दिवशीही कारवाई

नांदेड/प्रतिनिधी - राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा नांदेडातील तेरा व्यापा-यांना फटका बसल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्लास्टिक बॅग व साहित्याची विक्री करणा-या नऊ व्यावसायिकांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाच हजारांचा दंडही ठोठविण्यात आला तसेच रस्त्यावर कचरा टाकल्याबद्द्ल तिन जणांकडुन एकुण अडीच हजार रुपये वसुल करण्यात आले. रविवारी एकुण ४७ हजार पाचशे रुपये वसुल करण्यात आले.




प्लास्टिकमुळे निर्माण होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी शासनाने शनिवार पासून राज्यभर प्लास्टिकबंदी लागू केली आहे. या अंतर्गत विविध प्रकारच्या प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.


प्लास्टिकबंदी निर्णयाच्या दुसर्‍या दिवशीही पालिकेच्या अतिक्रमण व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने शहरात कार्यवाही सुरू ठेवली. या मोहीमेत प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणारे नऊ व्यावसायिक आढळून आले. यामध्ये कोमल मिनी मॉल पुर्णा रोड,प्रणित प्रोव्हीजन वजीराबाद,हॉटेल साईपुजा तरोदा नाका,फार्मा ट्रेडर्स,साई मेन्स वेअर, अशोक शिवरात्री,न्यु जनता बेकरी,फेमस मटन,बेंगलोर बेकरी व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजाविण्यात येवून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ४५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या या पथकाने वजीराबाद, बालाजी मंदिर, जुना मोंढा, शिवाजी नगर, आनंदनगर, श्रीनगर आदी ठिकाणी कारवाई केली.

आयुक्त लहूराज माळी यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त माधवी मारकड, एम.एम.बेग, गुलाम सादीक, डॉ. रईसोद्दीन, पोलीस पथक प्रमुख काजी, गणेश शिंदे व स्वच्छता निरीक्षक यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment