जिल्हा भाजपासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल : .दानवे

Monday, June 25, 2018

कनव्हीस करा की,कनफ्युज करा  निवडणूक मात्र जिंका-खा.दानवे

विशेष प्रतिनिधी
नांदेड-आगामी लोकसभा निवडणूकीची देशपातळीवर तयारी सुरु झाली आहे. भाजपा विरुध्द सगळे अशी रणनीती विरोधी पक्ष करीत आहेत. या सर्व शक्तीचा मुकाबला करण्यासाठी भाजपाची बुथ प्रणाली मजबूत करा, पक्षाचा पाया, निती, प्रसार व प्रचार या तीन तत्वांवर निवडणूक लढविली जाते. ज्याला निवडणूक लढविण्याची झुनझुनी आहे त्यांनी बुथ मजबूत करणे म्हणजे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी ग्राऊंड लेव्हल तयार केले पाहिजे. भाजपा सरकारने घेतलेले जनकल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोंहचवून मतदाराचे मतपरिवर्तन केले पाहिजे. मतदाराला कनव्हीस करा की कनफ्युज करा निवडणूक मात्र जिंका असा कानमंत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे दिला.

जिल्ह्यातील भाजपा बुथ प्रमुखांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी नांदेडचा धावता दौरा करुन शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बुथ आढावा बैठकीत निवडणूक कशी जिंकली पाहिजे याचे जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघातील गेल्या कांही निवडणूकीतील उदाहरणे देत मतदारांना कनव्हीस करा की कनफ्युज करा निवडणूक मात्र जिंका असा कान मंत्र देत असतानाच नांदेड जिल्हा भाजपातील वाढत्या गटबाजीची दखल घेत आगामी काळात जिल्हा भाजपासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही उपस्थित पदाधिकार्‍यांना दिला.


यावेळी प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, श्रावण पाटील भिलवंडे, प्रविण साले, संजय कौडगे, जि.प.सदस्या मीनलताई खतगांवकर आदिंची उपस्थिती होती.
पक्षाचा पाया म्हणजे बुथ आहे. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वन बुथ,टेंव्हटीफाईव युथ ही व्युवहरचना मजबूत कोणतीही निवडणूक पक्षाला जिंकता येत नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहिले पाहिजे. मनपा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नांदेडात शॉर्ट नोटीसवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला कोणी नेते सापडतील की नाही अशी शंका होती मात्र बर्‍यापैकी नेतीमंडळी व पदाधिकार्‍यांची उपस्थिती पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

देश व राज्य पातळीवर भारतीय जनता पक्ष आगामी निवडणूकीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे तुम्हीही कामाला लागा असे सांगून ते म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेचा उमेदवार कोण हे आज सांगणे अशक्य आहे. मलाही लोकसभेची उमेदवारी मिळते की नाही हे मी आज सांगू शकत नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना निवडणूक लढविण्याची झूनझूनी आहे, त्यांनी निवडणूकीचे ग्राऊंडलेव्हल तयार केले पाहिजे. निवडणूक जिंकण्यासाठी लागणार्‍या तीन गोष्टी म्हणजे पक्षाचे ग्राऊंड, स्टाटेजी, प्रसार व प्रसार याचे नियोजनबध्द ब्लूप्रिंट तयार करुन ठेवा. आपल्याला मतदान न देणार्‍या मतदाराला आपलंस करण्यासाठी त्या मतदाराला कनव्हीस करा अन्यथा कनफ्युज करा निवडणूक मात्र जिंकाच असा कान मंत्र देताना त्यांनी भोकरदन मतदारसंघात 1985 सालच्या निवडणूकीतील एका किस्सा सांगितला.

देशात भाजपा विरुध्द सगळे असे चित्र निर्माण झाले असतानाही बुथ प्रमुखांच्या जीवावरच भाजपाने देशातील अनेक निवडणूका जिंकल्या आहेत. एका विधानसभा मतदारसंघात किमान 300 बुथ असताता, वन बुथ-25 युथ या प्रमाणे जवळपास त्या मतदारसंघात भाजपाचे 7500 बुथ कार्यकर्ते तयार होतात. पक्षाचे इतर 500 कार्यकर्ते असे 8000 हजार पदाधिकार्‍यांचा मेळावा विधानसभा मतदारसंघ निहाय घेतल्यानंतरच भारतीय जनता पार्टीची ताकद पाहून ऐनवेळी निर्णय घेणारा मतदार हा भाजपाकडे आकर्षीत होवू शकतो. त्यासाठी प्रत्येक गावांत पक्षाचे बुथ कार्यकर्ते तयार करणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी मागील निवडणूकीचे उदाहणे देत कार्यकर्त्यांना पटवून दिले.

नांदेड भाजपासाठी कठोर निर्णय
नुकत्याच झालेल्या नांदेड महानगर पालिका निवडणूकीत भारतीय जनता पार्टीची झालेली हार लक्षात घेता पक्षपातळीवर त्याचा सुक्ष्मपध्दतीने अभ्यास केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर नांदेड जिल्हा भाजपासाठी कांही कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी देवून जुन्या-नव्याचा वाद आता संपूष्टात आणा असे संकेतही त्यांनी यावेळी पदाधिकार्‍यांना दिले आहेत.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment