अभिमन्यू पवार यांची सुपरफ़ास्ट एक्सप्रेस

Monday, June 25, 2018

फ़ास्ट
जनता दरबाराला अलोट गर्दी 

लातूर / प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अभिमन्यू पवार यांनी शासकीय विश्राम गृहावर जनता दरबार भरवला होता. 11 ते 1 ची वेळ असताना परत 4 ते 6 जनता दरबार घेण्याची वेळ आली. या जनता दरबाराला अलोट गर्दी होती. अनेक पुरूष, महिला, वृद्ध, युवक, शेतकरी, लोकप्रतिनिधी हे वैयक्तिक तसेच सार्वजनिक विकासाचे प्रश्‍न घेवून आले होते. ही गर्दी पाहिल्यानंतर एक वाक्य आठवलं. अभिमन्यू पवार यांची ही सुपरङ्गास्ट एक्सप्रेस आहे. किंबहूना लातूरातील हा पहिला जनता दरबार आहे की, ज्याला हजारो लोक उपस्थित होते. काही मित्रांनी फेसबुकवर हा जनता दरबार लाईव्ह केला होता. 

या जनता दरबारात लातूर नगर पालिकेचा टॅक्सचा विषय तसेच काळे बोरगाव येथे ग्रामसेवक नसल्याचा विषय, विविध गावांतील रस्त्याचे प्रश्‍न, लातूरात वाढलेले वाळूचे भाव तसेच सर्वात धक्कादायक म्हणजे शिक्षण सम्राट प्राध्यापक गोविंद घार नंतर डि.एन.केंद्रे, रामदास पवार यांच्यासह शिक्षण संस्था चालकांच्या प्रश्‍नासंदर्भात एक निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर तसेच कोणाला नोकरी, कोणाच्या बदल्या, घराचे कबाले, रस्त्याचे प्रश्‍न, पुलाचे प्रश्‍न यासह अनेक प्रश्‍न लोकांनी मांडले. यावेळा उपमहापौर देविदासराव काळे, नगरसेवक अजय कोकाटे, नगरसेवक नितीन वाघमारे तसेच लातूर तालुका भाजपा अध्यक्ष वडार समाजाचे दिलीप धोत्रे, नियोजन समितीचे संतोष बेंबडे, नगरसेवक चंद्रकांत बिराजदार सह मोठ्या प्रमाणात लोक होते. 
लोकांनी निवेदन दिल्यानंतर ते कोणत्या डिपार्टमेंटचे आहे. व जे व सोप्या पद्धतीचे काम असेल तर ते त्यासंदर्भात ङ्गोन करून सांगत होते. तब्बल तीन तास प्रचंड गर्दीत अभिमन्यू पवार लोकांच्या समस्यांचा चक्रव्यु छेदण्याचे काम करताना दिसून येत होते. या संदर्भात अनेक पत्रकारांनी ङ्गेरङ्गटका मारला. 

हैवाचे दर भिडले गगनाला 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांची घरे व्हावी यासाठी स्वस्त दरात कर्ज देत आहे. दोन वर्षाच्या दुष्काळानंतर लातूरात यावर्षी लोकांनी घराचे बांधकाम सुरू केले आहेत. पण लातूरात मात्र हैवाचा दर तिप्पट, चौपट वाढला आहे. यासंदर्भात निवेदन 30-40 लोकांनी देवून शहरातील वाढत्या वाळुच्या दराकडे लक्ष वेधले. 
कबाले मिळावेत 
जी.ए.गायकवाड यांनी घराचे कबाले मिळावे यासंदर्भात निवेदन दिले. 
बोरगावचा ग्रामसेवक 
बोरगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून तलाठी/ ग्रामसेवक नाही. तो त्वरीत मिळावा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. 
बदल्या, नोकर्‍या 
अनेकांनी झालेल्या बदल्या व नियमाप्रमाणे व्हावयाच्या बदल्या यासंदर्भात निवेदने दिली. 
टॅक्स संदर्भात निवेदन 
औसा रोडवरील मालमता कर व खनीमधील मालमता कर यासंदर्भातही अन्यायकारक वाढ असल्याची लोकांनी तक्रार केली. 
वडार समाजाचे शिष्टमंडळ भेटले 
वडार समाजाचे शिष्टमंडळ भेटून अभिमन्यू पवार यांच्याशी चर्चा केली. 
हा जनता दरबारचा प्रयोग रेणापूरमध्ये गोपीनाथरावजी मुंडे यांनी घेतला होता. त्यानंतर हा पहिलाच प्रयोग लातूरात असून लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.  शिक्षण संस्था चालकांनी सत्कार केला. तसेच दोघा-तिघांनी झालेल्या कामाबद्दल पेढे वाटले. अशा प्रकारे लातूरात अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात विकासाच्या गाडीने सुसाट वेग घेतला आहे. 
नाट्यगृहाची जागा निश्‍चित 
नाट्यगृहाची जागा जवळजवळ निश्‍चित झाली असून लवकरच त्याचा अंतिम निर्णय होईल असेही ते म्हणाले. एकंदरीत लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर पहिल्यांदाच हजार ते बाराशे दुचाकी वाहने दिसून आली. लातूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील पालगाव, खरोळा, रेणापूर, जवळी, अक्करवाई, देवळी येथील लोक होते. 

पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच मी कार्यक्रम घेतो 
दैनिक मराठवाडा नेताशी बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले की, मी पालकमंत्र्यांच्या कानावर घालूनच कार्यक्रम घेतो. आमच्या समन्वय आहे. आणि जनता दरबार सुरू करण्यापुर्वी मी ना. संभाजीराव पाटील यांना भेटूनच जनता दरबारास आल्याचे सांगितले. 


एकंदरीत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप अधिकात अधिक लोकांपर्यंत जात आहे. व अभिमन्यू पवार यांच्या विकासाची सुसाट एक्सप्रेस निघालेली आहे. 

तक्रारींचा पाऊस अन अलोट गर्दी 
मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचा जनता दरबार 

लातूर /प्रतिनिधी :सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात अनेक समस्या असतात .पण त्या सोडवायच्या कशा याचा मार्ग माहित नसतो .अशा समस्या सोडविणारा माणूस त्यांना देव भासतो .असाच काहीसा प्रकार रविवारी घडला . मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी लातुरात जनता दरबार घेतला. यावेळी तक्रारी आणि समस्यांचा अक्षरक्ष:पाऊस पडला .विशेष म्हणजे या तक्रारींचे जागीच निवारण झाल्याने उपस्थित नागरिक समाधानाने परत गेले .
अभिमन्यु पवार हे मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक आहेत. सतत मुख्यमंत्र्यांसोबत राहत असल्याने सामान्य जनतेच्या अडचणींची त्यांना जाण आहे .अनेकदा नागरिक किरकोळ समस्या घेवुन मुंबईत येतात .मुंबईत येणे -जाणे, राहणे आणि इतर बाबींसाठी दिवसाकाठी पाच हजार रुपये खर्च येतो .हा खर्च वाचावा , नागरिकांची धावपळ कमी व्हावी आणि समस्या सुटाव्यात यासाठी हा जनता दरबार त्यांनी घेतला .या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला .

केवळ एक दिवस अगोदर या जनता दरबाराची माहिती देण्यात आली होती . तरीही हजारो नागरिक यावेळी उपस्थित राहिले. या नागरिकांनी आपल्या समस्या पवार यांच्यासमोर मांडल्या . पवार यांनी केवळ त्या ऐकुन घेतल्या नाहीत तर संबधित व्यक्तीला दूरध्वनी करुन 
नागरिकांच्या समोरच समस्येचे निराकरण केले .अवघ्या तीन चार तासात शेकडो नागरिकांनी आपले गाऱ्हाणे मांडुन ते सोडवुनही घेतले .महसुल ,जलसंपदा ,पोलीस ,यासह महावितरण व इतर शासकीय विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत अडचणी याप्रसंगी पवार यांनी सोडविल्या .

मुख्यमंत्र्यांचा भार कमी करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवित आहोत . यामागे कसलाही राजकीय हेतु नाही .पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडण्यास आपण तयार असल्याचेही अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले.पवार यांचा जनता दरबार सामान्य जनतेला अतिशय भावला .अडचणी जागेवरच सोडविल्यामुळे जनतेने या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले .

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment