जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला धारेवर धरा!: खा. अशोक चव्हाण

Thursday, June 21, 2018


मुंबईदि. 21
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरा व जनतेला न्याय मिळवून द्या अशी सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ समन्वय समितीच्या बैठकीत केली. 
आज दुपारी विधानभवनातील काँगरेस पक्ष कार्यालयात काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली. भाजप शिवसेना युतीचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेमध्ये या सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबीत आहेत. या प्रश्नांवर आक्रमक होऊन अधिवेशनात सरकारला धारेवर धरा व सामान्यांना न्याय मिळवून द्या असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाणविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलविधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसेप्रतोद आ. संजय दत्तआ. भाई जगताप,आ. जोगेंद्र कवाडेआ. सुनिल केदारआ. डी.पी. सावंतआ. अमर राजूरकरआ. बसवराज पाटीलआ. चंद्रकांत रघुवंशी,विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे समन्वयक संजय खोडके आदी उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 

Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment