कार्य सोयीस्कर होण्याकरिता क्षेत्रीय अधिकार्यांची बदली
लातूर दि प्रतिनिधी
लातुर शहर महानगर पालिकेले कार्य लोकाभिमुख होण्याकरिता व प्रशाशनास सोयीस्कर व्हावे याकरिता आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपल्या अधिकारतील अधिकचे अधिकार वापरण्याचे अधिकार उपायुक्ताना प्रदान केले आहेत.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अन्वये आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारातून उपायुक्त यांना सर्व विभागांचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार म्हणून ३ लक्ष रुपये मर्यादेतील अधिकार देण्यात आले आहेत . तसेच क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी याची बदली हि करण्यात आली आहे , त्यामध्ये “ब” क्षेत्रीय कार्यालच्या श्रीमती शिंदे एस एम क्षेत्रीय अधिकारी याची बदली नगर रचना विभागात , त्याच्या जागेवर “ ड ” क्षेत्रीय कार्यालायचे क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी याना पाटविण्यात आले आहे, मालमता व्यवस्थापक कलीम शेख यांच्या कडे स्वतःचे कार्य संभाळून क्षेत्रीय कार्यालय “ अ ” चे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे . विधी विभागाचे समाधान सूर्यवंशी यांच्या कडे स्वतःचे काम संभाळून क्षेत्रीय कार्यालय “ क ” चे क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्य करायचे आहे. प्रमुख स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत राउत यांच्या कडे स्वतःचे काम संभाळून क्षेत्रीय कार्यालय “ ड ” चे क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्य करायचे आहे, तरी वरील प्रमाणे सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना घन कचरा व्यवस्थापन , नाले सफाई , रस्त्यावरील अतिक्रमण , बांधकाम साहित्य हटवणे , अनाधिकृत बांधकाम वर कारवाई करणे , पार्किंग व फेरीवाला धोरण राबविणे , भटकी जनावरे कारवाई , पथदिवे दुरस्ती व व्यवस्थापन,पाणी पुरवठा सुरळीत करणे, प्लास्टिक बंदी, मालमत्ता कर व पाणी कर वसुली, वेलोवेलीचे इतर अनुषगिक कामे सर्व क्षेत्रीय अधिकरी यांनी करावयाचे आहे असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत, तरी सदरील बातमी माहितीस्तव प्रसिद्ध करावी.

No comments:
Post a Comment