राज्य सरकार राबविणार अजित पाटलांची संकल्पना

Wednesday, June 20, 2018


उपक्रम ठरला राज्यासाठी दिशादर्शक

लातूर / प्रतिनिधी : युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करावे साठी एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना राबविली होती .ही संकल्पना राज्यासाठी दिशादर्शक ठरली असून राज्य सरकार संपूर्ण राज्यात ही संकल्पना राबविणार असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वनमंत्र्यांच्या साक्षीने सांगितले . यामुळे युवा नगरसेवक अजित पाटलांची संकल्पना राज्यभर राबविली जाणार आहे नव्हे अजित पाटील यांचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे .लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड अत्यंत कमी आहे .वनी करणाच्या बाबतीत लातूर जिल्ह्याचा क्रमांक खालून पहिला आहे .जिल्ह्यात दुष्काळी स्थिती कायमच असते .पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे .


 यामुळे माता-भगिनींना डोक्यावर हंडे घेऊन भटकंती करावी लागते .हे थांबवायचे असेल तर वृक्षलागवडी शिवाय पर्याय नाही हे ओळखून युवा युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी गतवर्षी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे धडे दिले . केवळ वृक्ष लागवड करा असे सांगून ते थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले .शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे वर्षभर संगोपन करावे अशी कल्पना त्यांनी मांडली .दर महिन्यात त्या झाडाच्या वाढी संदर्भातील माहिती वर्ग शिक्षकाकडे देण्यास सांगण्यात आले . ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी विशेष वह्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. 

वर्षभराचा एकूण आढावा घेऊन त्या विद्यार्थ्याला ठराविक गुण देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला होता . जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अजित पाटील यांनी राबवलेली ही संकल्पना कमालीची यशस्वी ठरली . प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षाचे संगोपन केले .त्यामुळे झाडांची संख्या वाढण्यास हातभार लागला .हे पाहून जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांनी ही संकल्पना उचलून धरली .

रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लातूरच्या दौर्‍यावर होते . यावेळी जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अजित पाटील यांची संकल्पना वन मंत्र्याना सांगितली .मुनगंटीवार यांनाही ही संकल्पना पसंत पडली . त्यामुळे मुनगंटीवार यांच्या साक्षीने पालकमंत्री निलंगेकर यांनी आता राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले .त्यामुळे राज्यात आता अजित पाटलांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देऊन एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना राबविली जाणार आहे .अजित पाटील यांचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे .
नगरसेवक म्हणून काम करताना अजित पाटील यांनी कायमच नवनवीन उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले आहे. स्वच्छता ,कचरा वर्गीकरण ,त्यापासून खत निर्मिती ,प्लास्टिक पासून रस्ता आणि वृक्ष लागवड यासारखे त्यांचे उपक्रम लोकप्रिय ठरले आहेत .आता एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना राज्य सरकारने उचलून धरल्यामुळे पाटील यांच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे .


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment