खा सुनिल गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात

Wednesday, June 20, 2018

कासार शिरसी वृध्दाश्रमात आजी - आजोबांसोबत कापला केक

लातूर, दि.१९ - खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी लातूर शहरासह मतदार संघात उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला डॉ. गायकवाड यांना जाहीर झालेल्या संसदरत्न पुरस्करामुळे शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ‘जयश्री’ निवासस्थानी हजारो सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी गर्दी केली होती.

खा. डॉ. सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल, ङ्गेटा, केक, पेढे भरवून वाढदिवसाला उपस्थिती लावली. निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथील आधार वृध्दाश्रमात जाऊन डॉ. सुनील गायकवाड यांनी तेथील आजी - आजोबांच्या उपस्थितीत केक कापला. यावेळी वृध्दाश्रम परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. वृध्दाश्रमातील आजी- आजोबांच्या प्रकृतीची विचारपूस डॉ. गायकवाड यांनी आस्थेवाईकपणे केली. 

लातूरच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांमध्ये सीआरपीएङ्गचे महानिरीक्षक देवेंद्रजितसिंह, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, निलंगा पंचायत समिती सभापती अजित माने, युवा भीम सेनेचे पंकज काटे, रिपाइंचे राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, नगरसेवक हणमंत जाकते, देवाभाऊ साळुंके, डॉ. दीपा गिते, विठ्ठल गिते, ऍड. गणेश गोमचाळे, औरंगाबादच्या प्रा. अनिता भंडारे, हरिभाऊ गायकवाड, पप्पु गायकवाड, प्रा. अनंत लांडगे, राम बेल्लाळे, साधू गायकवाड, आधार वृध्दाश्रमाच्या प्रमुख मनिषा होळकुंदे, प्रा. दर्शना देशमुख, डॉ. विजय बोराडे - पाटील, बाबूराव बोडके, कासार शिरसीचे सरपंच हलप्पा कोकणे यांच्यासह कासार शिरसी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment