हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी संघटनात्मक शक्तीची गरज-आ.टायगर राजासिंह

Tuesday, May 29, 2018
नांदेड/प्रतिनिधी -दिवसेंदिवस हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे, धर्म संकटात आला आहे, मात्र हिंदू युवक फेसबुक आणि व्हॉटसऍपवर व्यस्त आहेत. असेच चालू राहिले तर येणार्‍या काळात हिंदू अल्पसंख्य आणि धर्मांध बहुसंख्य होतील यासाठी हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी आपली संघटनात्मक शक्ती दाखवून द्या’, असे आवाहन हैदराबाद येथील श्रीराम युवासेनेचे संस्थापक आमदार टायगर राजासिंह यांनी येथे केले. 
नांदेड येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नवामोंढा मैदानावर आयोजित अतिविशाल हिंदू धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला सनातन संस्थेचे धर्म प्रसारक नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील धनवट, रणरागिनी शाखेच्या रागेश्री देशपांडे, शिवसेना आमदार हेमंत पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे आदींची यावेळी उपस्थिती होती.
अमोल वानखेडे यांनी शंखनाद करुन सभेला प्रारंभ झाला. त्यानंतर सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ या जयघोषात राजासिंह यांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा प्रियंका लोणे यांनी घेतला.
राजासिंह आपल्या भाषणात म्हणाले की, शहराच्या रेल्वेस्थानकावर हिंदूंना रिक्षा लावण्यास मनाई केली जाते, त्यामुळे नांदेड हिंदुस्थानात आहे की पाकिस्तानात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील महिला व्यायाम शाळेत मुस्लिमांचे ट्रेनर आहेत. या जीम आता बंद झाल्या पाहिजेत, लव्ह जिहाद’ला येथील हिंदू युवती मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत, माझे तर असे म्हणणे आहे की, दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या सर्वांचे मतदान ओळखपत्र रद्द करा आणि शिधापत्रिकावरील त्यांना देण्यात येणार्‍या सवलती आणि शासनाच्या अन्य सवलती बंद करा.
 या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस हिंदूंची संख्या कमी होत आहे, त्यामुळे येणार्‍या काळात हिंदू अल्पसंख्य आणि धर्मांध बहुसंख्य होतील, त्यामुळे आता सावध रहा आणि स्वसंरक्षणासाठी तलवार चालवायला शिका’, असे आवाहन त्यांनी केले. गरज पडली तर आम्ही ही तलवारबाजी शिकविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हायवेवर चालू असलेले धाबे त्यांची नावे भलेही काही असोत, मात्र त्याठिकाणी बिनधास्तपणे मुस्लिमांकडून गोमास विक्री करुन ती खायला दिली जाते’, असेही ते म्हण ाले. शहरातील अनेक भागात रस्ते अडवून नमाज पठण केले जाते, लव्ह जिहादसारख्या मोठ्या संकटाला सध्या हिंदू युवतींना सामोरे जावे लागत आहे, तेव्हा वेळीच सावध व्हा आणि हिंदू युवतींचे रक्षण करा’, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सदगुरु नंदकुमार जाधव, सुनील धनवट, रागेश्री देशपांडे यांचीही प्रभावी भाषणे झाली. यावेळी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी आमदार राजासिंह यांचा तलवार, शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून त्यांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment