प्रल्हाद उमाटे
बिलोली-महाराष्ट्र राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेल्या खा.अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी उदासीन धोरण स्विकारल्यामुळेच जिल्ह्यातील सीमावर्ती गावांतून तेलंगनात समावेश होण्याची मागणी जोर धरत आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाचा खासदार निवडून आल्यानंतर जिल्ह्याचा समतोल विकास साधला जाईल. त्यासाठी कॉंग्रेसचे हे निष्क्रीय नेतृत्व स्विकारायचे की भाजपाला संधी द्यायची याचा विचार केल्यास तेलंगनात समाविष्ट होण्याची वेळ आपल्यावर येणार नाही असा विश्वास आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बिलोली येथील जनतेला दिला.
जय वाल्मीकी प्रतिष्ठाण बिलोलीच्यावतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही १५ व्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या लावणी महोत्सवाचे उद्घाटन आ. चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते कॉंग्रेसचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर निशाना साधला.
लावणी महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी आ. चिखलीकर यांनी बिलोली येथील विश्रामगृहावर वार्ताहरांशी संवाद साधताना म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आपणास आदेश दिल्यास आपण नांदेड लोकसभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचा गौप्यस्फोट केला. तांत्रिकदृष्ट्या आज शिवसेनेचा आमदार असलो तरी भविष्यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने आगामी लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगून ते म्हणाले, ज्या चव्हाण कुटूंबाने देशात व राज्यात अनेक दशकापासून सत्तास्थानी असतानाही त्यांना नांदेड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधता आला नाही. नांदेड जिल्ह्यातील जनतेने अशोकराव चव्हाण यांना खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे फिरकलेही नाही. निवडणूका आल्या की भावनीक आव्हाने करुन जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग आगामी लोकसभा निवडणूकीत मतदार बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही व्यक्त करुन सबका साथ, सबका विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा खासदारच निवडून येईल असादावाही त्यांनी यावेळी बोलतांना केला.
राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे उद्घाटन करताना आ.चिखलीकर म्हणाले, ज्या भागाचा लोकप्रतिनिधी जनतेच्या अडीअडचणीत धावून येतो, त्या भागातील जनतेच्या मनात दुसर्या राज्यात जाण्याची भावनाही येत नाही. विकासापासून कोसो दूर असलेल्या धर्माबाद, बिलोली, देगलूर या सीमावर्ती भागातील जनतेच्या मनात तेलंगनाचा होत असलेला विकास पाहून त्या राज्यात समाविष्ठ होण्याची भावना निर्माण झाली आहे. त्यास जिल्ह्याचे निष्क्रीय खासदारच जबाबदार असल्याची टीका केली.
खासदार हा जिल्ह्याचा असतो, त्यांचे कार्यक्षेत्र एका विधानसभा मतदारसंघापूरते मर्यादीत नसते. आपले खासदार मात्र एकाच विधानसभा मतदारसंघाचा विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वाधिक खासदार निधी त्यांनी आपल्या पत्नीच्या विधानसभा मतदारसंघाकडे वळते केल्यामुळेच सीमावर्ती भागातील गावे आजही विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या खासदाराची खरी गरज आहे.
हे राजकीय व्यासपीठ नसले तरी वस्तुस्थितीचे दर्शन जनतेला झाले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे आयोजन यशवंत गादगे यांनी गेल्या पंधरा वर्षापासून करीत आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे. एखादा उपक्रम सातत्याने सुरु ठेवणे हे अवघड काम आहे. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृती आहे. ती जोपासली पाहिजे. यशवंत गादगे यांच्या अथक परिश्रमामुळे लावणी ही ग्रामीण भागात येवून पोंहचली असल्याचेही आ. चिखलीकर यांनी सांगितले.
आगामी लोकसभेची तयारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने नांदेड जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात लोहा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी प्रतापराव तुम्हाला लोकसभा लढवायची आहे, तुम्ही कामाला लागा असा कानमंत्र दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीची बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आ. चिखलीकरांच्या शिफारशीनुसार नांदेड लोकसभा मतदार संघात २ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असल्याचेही वृत्त हाती आले आहे. बिलोली येथील लावणी महोत्सवाचे निमित्त साधून चिखलीकरांनी आगामी लोकसभा मतदारसंघाची बांधणी करीत असताना खासदार चव्हाण यांना टीकेचे लक्ष्य केले असल्यामुळे आगामी लोकसभेचा फड खा.चव्हाण विरुध्द आ.चिखलीकर असा रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत चिखलीकरांच्या भाषणातून प्राप्त होत आहेत हे विशेष!
आ.चिखलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन लावणी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. लावणी सम्राज्ञी हा पुस्कार प्राप्त करणार्या भाग्यश्री नगरकर हिचा गौरव मानपत्र देवून करण्यात आला. यावेळी लावणी महोत्सवाचे संयोजक यशवंत गादगे, पत्रकार प्रल्हाद उमाटे, गोविंद मुंडकर, बिलोलीचे माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबराव बागेलवाड, इंद्रजित तुडमे आदिंची उपस्थिती होती. प्रारंभी यशवंत गादगे यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन प्रा. गोपाळ चौधरी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment