गनिमीकावा संघटनेच्या वतीने लातुरात आज पाणी परिषद

Tuesday, May 29, 2018
 लातूर,दि.२८ - गनिमीकावा संघटनेच्या वतीने दि. २९ मे मंगळवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील शेकडो गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. येणार्‍या कांही वर्षात मराठवाड्याचे वाळवंट होईल असा अंदाज अनेक जलतज्ञांनी व्यक्त केला आहे. याची कारणे व उपाययोजना या विषयी जागतिक कीर्तीच्या जलतज्ज्ञासोबत चर्चा व्हावी या उद्देशाने ही पाणी परिषद आयोजित केली गेली आहे.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे हे राहणार असून, जागतिक कीर्तीचे जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जलतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, अवधूत चव्हाण, सुभाषराव जावळे यांची या पाणी परिषदेत प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि. २९ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात होणार्‍या या पाणी परिषदेसाठी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment