जनाची नाही, मनाची तरी ठेव, मुख्यमंत्र्यांचं आदेश बांदेकरांवर टीकास्त्र

Saturday, May 26, 2018

पालघर निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत वसईत स्पष्टीकरण दिलं.पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना या पातळीवर उतरली आहे. 

जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते वसईत बोलत होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप केला.

आदेश बांदेकरांवर टीकास्त्र
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेने नेते आणि सिद्धीविनायक ट्रस्ट अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.आदेश बांदेकर यांनी पालघरच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते वाचून दाखवलं होतं. त्यावरुन मुख्यमंत्री बांदेकरांवर हल्ला चढवला.

No comments:

Post a Comment