हिंगोली / प्रतिनिधी - आरोपीला जामीन मिळवून दिल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून वसमत तालुक्यातील हट्टा येथील पोलीस उपनिरीक्षक जोंधळे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १० हजार रूपये घेण्याचे ठरले. त्यावरून १६ मे रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १० हजार रूपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक शुद्धोधन जोंधळे याला रंगेहाथ पकडले.
तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे १५ मे रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करून एसीबीने ही कारवाई केली. यातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक शुद्धोधन जोंधळे यांनी आरोपीकडे जामीन मिळवून दिल्याच्या मोबदल्यात व गुन्ह्यातील जप्त केलेले ट्रॅक्टर व ट्रॉली सोडण्यासाठी १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडी अंती १० हजार रूपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करून १६ मे रोजी हट्टा पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदाराकडून १० हजार रूपये लाचेची रक्कम घेताना पीएसआय जोंधळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपाधिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, शेख उमर, सुभाष आढाव, अभिमन्य कांदे, संतोष दुमाने, शेख जमीर, ओमप्रकाश पंडीतकर, विजयकुमार उपरे, महारूद्र कबाडे, प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, आगलावे यांच्या पथकाने केली. पोलीस प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्याचे हे लाचखोरीचे प्रकरण पुढे आल्याने अवैध धंदे व आदी कारणांमुळे डागाळलेली हिंगोली पोलीसांची प्रतिमा अजूनच खालावली आहे.

No comments:
Post a Comment