दिल्लीत घातपाताचा कट उधळला दोन दहशतवादी गजाआड !

Friday, January 25, 2019
नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनेचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला जैशे मोहंमदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी एक श्रीनगर येथील ग्रेनेड हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. 


अब्दुल लतिफ गनी ऊर्फ उमेर ऊर्फ दिलावर असे त्याचे नाव असून, त्यास २० जानेवारी रोजी रात्री दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. श्रीनगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असणारी मास्टरमाइंड गनी पुन्हा एकदा घातपात घडवून आणण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

अब्दुल लतिफ गनी हा प्रजासत्ताक दिनी राजधानीतील गर्दीच्या ठिकाणी हल्ली घडवून आणण्याचा कट करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवली आणि २० जानेवारी रोजी त्याला स्फोटकांसह ताब्यात घेतले. 

त्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांचे विशेष पथक श्रीनगरमध्ये अयईडी स्फोटक आणि ग्रेनेड जप्त केली. तसेच आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली, हिलाल असे दहशतवाद्याचे नाव असून त्याला बांदिपुरा येथे अटक करण्यात आली. 

त्याने दिल्लीत टार्गेट भागातील रेकी केली होती. ही कारवाई करण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी जैशे ' च्या दहशतवाद्यांची माहिती श्रीनगर पोलिसांना दिली. त्यानंतर काश्मीरच्या ग्रेनेड हल्ल्यात सामील असलेल्या मोड्यूलच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

No comments:

Post a Comment