डॉ. अशोक कुकडे काका यांना पद्मभूषण

Friday, January 25, 2019

लातूर : विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
मूळचे पुणे येथील डॉ. अशोक कुकडे यांनी १९६४ साली आरोग्य सेवेसाठी लातूरला आले . तत्पूर्वी डॉ. कुकडे यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज येथे झाले. एमएसमध्येही सर्वप्रथम आले होते.

ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात सेवा देण्याचा निश्चय डॉ. कुकडे यांनी केला. त्यांच्यासोबत पत्नी डॉ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. भराडिया, डॉ. आलूरकर लातूरला आले. काही काळ खाजगी सेवा दिल्यानंतर ट्रस्ट हॉस्पिटल उभे केले. ज्याचा विस्तार विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्र असा झाला आहे.

सामाजिक जाणिवेतून संघटित वैद्यकीय सेवा पुरविण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानने लातूरमध्ये केल. अलिकडच्या काळात कॅन्सर उपचारही ग्रामीण भागात अत्यंत कमी दरात मिळावेत, यासाठी डॉ. कुकडे यांनी अथक परिश्रम घेतले. कॅन्सर केअर सेंटर उभारले. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय उभारलेले देशातील एकमेव कॅन्सर केअर सेंटर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानमुळे ग्रामीण भागात सेवेत आले.

डॉ. अशोक कुकडे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण समिती या शिक्षण संस्थांचेही अध्यक्षपद भूषविले आहे 

No comments:

Post a Comment