लातूर : बेकायदा सावकारीच्या संशयावरून सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील शारदोपासक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व वीरशैव लिंगायत मंडळ ट्रस्टचे सचिव बसवराज वैजनाथ गस्तगार यांच्या घरावर छापा टाकला. यात पथकाच्या हाती चांगलेच घबाड लागले असून, सापडलेल्या कागदपत्रांवरून गस्तगार यांच्यावरील बेकायदा सावकारी व्यवसायाचा संशयाला पुष्टी मिळत आहे.
छाप्यातसावकारी व्यवहाराच्या नोंदीची एक डायरी व खरेदीखतासह कोरे चेक व स्टॅम्पपेपर सापडले आहेत . छाप्यानंतर गस्तगार यांच्यावर पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्याची माहिती शिरूर अनंतपाळचे सहायक निबंधक संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
गस्तगार उपाध्यक्ष असलेल्या शारदोपासक शिक्षण संस्थेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात डॉ अजितसिंह गहेरवार प्राचार्य आहेत त्यांनी गस्तगार यांच्याकडून वीस लाख रुपये दहा टक्के शेकडा व्याजाने घेतले होते.
गस्तगार उपाध्यक्ष असलेल्या शारदोपासक शिक्षण संस्थेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात डॉ अजितसिंह गहेरवार प्राचार्य आहेत त्यांनी गस्तगार यांच्याकडून वीस लाख रुपये दहा टक्के शेकडा व्याजाने घेतले होते.
यासाठी त्यांनी प्राचार्य गहेरवार यांच्याकडून शंभर रुपयाचे कोरे स्टॅम्प बँकेचे कोरे चेक सही करून तारण ठेवून घेतले. प्राचार्य गहेवार यांनी त्यांच्या पगारातून दरमहा व्याजासह या रकमेची परतफेड केली . तरीही गस्तगार यांच्याकडून गहेवार यांच्याकडे आणखी पैशाचा तगादा सुरू झाला. या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी याची गंभीर दखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यावरून शिरूर अनंतपाळचे सहायक निबंधक संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गस्तगार यांच्या घरावर बुधवारी पोलिसांच्या मदतीने सकाळी छापा टाकला. पाच तास चाललेल्या छाप्यात पथकाला पाच ते सहा कोरे स्टॅम्प व दहा ते अकरा कोरे चेक तसेच पाच ते सहा खरेदीखत हाती लागले आहेत . सावकारी व्यवहाराची नोंद असलेली डायरीही पथकाला सापडली असून त्यावरील नोंदी सापडलेल्या कागदपत्रांसोबत जुळतात का, याची तपासणी करण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment