मुंबई येथे झोनल सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली . मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेन्द्र शर्मा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीस उप महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ , सचिव साकेत कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीदर -लातूर - मुंबई या गाडीला प्रचंड गर्दी असते . अनेक प्रवाशाना आरक्षण मिळत नाही . यासाठी बर्थ वाढवून द्यावेत अशी मागणी आपण बैठकीत केली होती . त्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालयाने मागणी मंजूर करतानाच या गाडीसाठी अत्याधुनिक एल एच बी कोच देण्याचे ठरवले आहे . सध्या एका बोगीत ७२ बर्थ असतात . नव्या एल एच बी बोगीमध्ये ८२ बर्थ असणार आहेत. त्यामुळे १८ डब्यांचे एकूण १८० बर्थ वाढणार असून यामुळे प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे.
महिलांची छेड काढण्याच्या घटना घडू नयेत यासाठी महिलांच्या डब्यात महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली होती. ती देखील मंजूर करण्यात आली आहे . आर पी एफ आणि एम एस एफ मधून सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत.
रेल्वेमध्ये विना परवाना विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली होती . त्यावरून कलम १४४ अंतर्गत १७०६ फेरीवाल्याना पकडून त्यांच्याकडून १८ लाख ६९ हजार ६१५ रुपये तर कलम १४७ अंतर्गत ४२५ फेरीवाल्यांकडून २ लाख १७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला . या प्रकरणी अनुक्रमे ९३ व ५२ फेरीवाल्याना तुरुंगाची हवा खावी लागली.
रेल्वेमध्ये स्वच्छता असावी , तिरुपती आणि अजमेर या गाड्या लातूरहून सुरू कराव्यात , नांदेड मंडल प्रबंधक कार्यालय मध्य रेल्वेला जोडावे आदी मागण्याही शेख यांनी या बैठकीत केल्या . लातूरहुन मुंबईसाठी आणखी एक स्वतंत्र गाडी सोडावी, कुर्ला बिदर ही गाडी ४० तास कुर्ला येथे उभी असते.
बीदरहून ती तिरुपतीपर्यंत सोडावी . ३० तासात ती परत येऊ शकते , अशी मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले . दिव्यांग नागरिकांना यापुर्वी प्रमाणपत्रासाठी सोलापूर येथे जावे लागत होते . जवळपास ८ जिल्ह्यातील दिव्यागाना तेथे जाणे कठीण होते.
हा त्रास थांबविण्याची शेख यांची मागणीही मंजूर झाली असून आता त्या - त्या परिसरातील रेल्वे स्थानकावर हे प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे निजाम शेख यांनी सांगितले . या बैठकीस समितीचे सदस्य राजेंद्र जोशी , नितीन परमार , नितीन पांडे , मदनसिंग चावरे , सत्यकुमार सिंह , बसवंतकुमार शुक्ला , धर्मेंद्र आचार्य यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment