लातूर जिल्हयातील रस्त्यांचा कायापालट होणार !

Friday, January 25, 2019
लातूर :- जिल्हयातील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांना व त्यांच्या विभागाच्या पाहणीतून आवश्यक असलेल्या ६३ रस्त्यांच्या कामांसाठी १४ कोटी २० लाख रूपयांची प्रशासकीय मंजूरी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे .


त्यामुळे ग्रामीण भागात आगामी काळात मोठया प्रमाणात रस्त्यांच्या कामे होणार आहेत. लातूर जिल्हयात जिल्हा परिषदेच्याअंतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने दळणवळण व्यवस्था आडचणीत आली आहे कांही ठिकाणचे रस्ते मोठया प्रमाणात खराब झाल्याने अशा रस्त्यांची कामेमार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षीक योजना ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करण्यासाठी १० कोटी ८५ लाख रूपयांची ५१ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. 

जिल्हा वार्षीक योजना इतर जिल्हा रस्ते व मजबुतीकरण करण्यासाठी १२ रस्त्यांच्या कामांना २ कोटी ४५ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात रस्त्यांची दुरावस्था मोठया प्रमाणात झाली होती. रस्त्यांची लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पाहणी करून नविन रस्ते , सिमेंट रस्ते या माध्यमातून रस्त्यांचे मजबूतीकरणाचे प्रस्ताव तयार केले आहेत. 

जिल्हयातील ६३ रस्त्यांच्या कामांवर जिल्हा वार्षीक योजनेतून १४ कोटी २० लाख रूपये खर्च होणार असून रस्त्यांच्या कामांची सध्या टेंडर प्रक्रिया गतीमान झाली आहे. या रस्त्यांच्या कामांची टेंडर प्रक्रीया फेब्रुवारी अखेरपर्यत पूर्ण होणार आहे २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची मार्गी लागणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली .

No comments:

Post a Comment