पतंग उडवताना पडून मुलगा ठार

Monday, January 14, 2019


वैजापूर: संक्रातीनिमित्त गच्चीवर पतंग उडवणे सात वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले. पतंग उडवतांना शहरातील भाटिया गल्ली भागात चार मजली इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. लक्ष नरेंद्र संपत, असे मृत मुलाचे नाव आहे.

 रविवारी सुटी असल्याने तो पतंग उडवण्यासाठी घराबाहेर गेला होता. पतंग उडवण्यासाठी तो भाटिया गल्लीतील चार मजली महाजन वाडीच्या वरच्या मजल्यावर गेला. तेथून तो खाली पडल्यामुळे गंभीर अवस्थेत शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तो सेंट मोनिका शाळेचा पहिला विद्यार्थी व वैजापूर एसटी आगारातील नरेंद्र संपत यांचा मुलगा होता.

No comments:

Post a Comment