सहस्रकुंडात बुडून रेल्वे अधीक्षकाचा मृत्यू

Monday, January 14, 2019
नांदेड :- सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेले असता पाय घसरून कुंडात पडल्यामुळे नांदेड येथील रेल्वेच्या मुख्य कार्यालयातील अधीक्षक गोविंदराव गोपाळराव बसवंते यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला. 


बसवंते हे मित्रांसह सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेले होते. मात्र पाय घसरून ते कुंडात पडले. मित्रांनी शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनीही शोधाशोध केली. मात्र सायंकाळची वेळ असल्याने पाण्यात शोधणे कठीण झाले. रविवारी सकाळी भोई लोकांच्या मदतीने कुंडातील पाण्यात शोधाशोध करण्यात आली. काही वेळातच बसवंते यांचा मृतदेह सापडला

No comments:

Post a Comment