बीड : 'वंचित बहुजन आघाडीचा खासदार निवडून द्या, आरएसएसवाल्यांना कायमचंच जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही,' असं म्हणत भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेल्या प्रकाश आंबेडकर यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली. आरएसएस आणि बीजेपीचा इतिहास दंगलीचा आहे. निवडणुकीच्या अगोदर कुठले आंदोलन केले नाही, फक्त हिंदू-मुस्लिम दंगली घडवणे हेच त्यांचे एकमेव आंदोलन आहे, असा आरोपही त्यांनी संघ आणि भाजपवर केला.
'मोहन भागवत यांच्याकडे AK 47 आहे. त्यांना का पकडले जात नाही, आम्हांला पकडायला निघाले. त्यांना एक.न्याय आणि आम्हाला एक न्याय असे का ? असा सवालही बीडच्या सभेत आंबेडकरांनी विचारला. 'सरकारी तिजोरीतला पैसा पळवण्याचा प्रयत्न चालला आहे. नोटाबदलाच्या प्रक्रियेतून सरकारने 40% पैसा गोळा केला. हाच निधी निवडणुकीत लोकांना खरेदी करण्यासाठी वापरला जात आहे. महाराष्ट्रातील सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्याला फाशी द्यावी, पण भ्रष्टाचार होतो म्हणून 40 योजना बंद योग्य नाही,' असंही प्रकाश आंबेडकर म्हणाला.
No comments:
Post a Comment