मतिमंद तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमास सक्तमजुरी

Wednesday, January 9, 2019


खेड : मतिमंद, विकलांग तरूणीवर बलात्कार करणा-या नराधमास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुराद इकबाल मेटकर (४०), असे त्या नराधमाचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ चे न्यायाधिश हेमंत आवटे यांनी ही शिक्षा सुनावली. बलात्काराची ही घटना १० नोव्हेंबर २०१४ रोजी शिव बुद्रुक मडीवाडी येथे घडली होती. सक्त मजुरीची शिक्षा सुनावल्याची ही या आठवडयातील दुसरी घटना आहे.
शारिरीक विकलांग व मतिमंद असलेली पीडित तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा उचलत मुराद मेटकर याने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सागितल्यास ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडित तरूणीची आई व बहीण मोलमजुरी करून उपजीविका करत होते. १० नोव्हेंबर रोजी त्या दोघी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तात्काळ येथील पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment