बळीराजा त्यांना माफ करणार नाही : पंकजा मुंडें

Tuesday, January 8, 2019
Related image



लातूर : भाजपच्या सरकारने शेतक-यांची खरी काळजी घेतली पण ज्या काॅग्रेस व राष्ट्रवादीने सत्तर वर्ष त्यांना लुटले तेच लोक खोटा प्रचार करून शेतक-यांच्या मनात भाजपविषयी विष कालवत आहेत. शेतक-यांच्या नावांखाली अनेक योजना त्यांनी गिळंकृत केल्या, सिंचनातही कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला, त्यांना बळीराजा कधीही माफ करणार नाही असा घणाघात ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. भाजपच्या शेतकरी संवाद यात्रेला काल  औसा येथून सुरूवात झाली, त्यावेळी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या.
कर्जमाफी, पीक विमा तसेच पिकाला हमीभाव यासारखे अनेक हिताचे निर्णय भाजप सरकारने घेतल्यामुळे शेतक-यांना आज चांगले दिवस दिसत आहेत. या सरकारलाच शेतक-यांची खरी काळजी आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनेतून मराठवाड्यात पाणी पेरण्याचे काम करून शेतक-यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले आहे. खोटा प्रचार करून शेतक-यांच्या मनात भाजपविषयी विष कालविणा-यांनीच मागील सत्तर वर्षात शेतक-यांची अक्षरशः लूट केली अशा शब्दांत मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेतला.

No comments:

Post a Comment