लातूरकरांनो... फक्त मतदार नव्हे तर 2019 च्या निवडणुकीचे भाजपचे शिल्पकार बना : अमित शहा

Monday, January 7, 2019



 लातूर, दि. 6 :.... प्रा. रामेश्‍वर बद्दर रेणापूरकर
लातूरकरांनो... तुम्ही फक्त मतदार बनून मूकनायकाची भूमिका न घेता येणार्‍या काळात गेल्या 5 वर्षात गरीबी, देशाची सुरक्षा आणि सन्मानासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून संपूर्ण मराठवाडाभर मोदीच्या सरकारचे शिल्पकार बना, असे भावपूर्ण आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमितजी शहा यांनी केले. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनिल गायकवाड, शैलेश लाहोटी, नागनाथ निडवदे, महापौर सुरेश पवार होते.
आपल्या 55 मिनीटाच्या भाषणात अमितजी शहा म्हणाले की, मी 2019 च्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्यासाठी येथे आलो आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग आणि बलिदान केलं आणि आजपर्यंत भारताची लोकशाही शांततेच्या मार्गाने परिवर्तन केलेलं आहे आणि देशाला पुढे घेवून जाण्यासाठी फक्त आणि फक्त पक्षांतर्गत लोकशाही असणार्‍या भारतीय जनता पार्टीने काम केलेले आहे. 

1625 पार्ट्या
देशात 1625 राजकीय पक्ष आहेत. फक्त भाजप आणि कम्युनिस्ट पार्टी हे लोकशाही असलेले पक्ष आहेत. इतर सर्व पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेस पार्टी ही घराणेशाहीची पार्टी आहे. एन.टी. रामराव असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सर्व घराणेशाहीने चालणारे पक्ष आहेत.
पोस्टर लावणारा अध्यक्ष चहा विकणारा पंतप्रधान
1982 मध्ये मी पोस्टर लावत होतो. मी आज अखिल भारतीय अध्यक्ष आहे आणि चहा विकणारा पंतप्रधान आहे. भारतीय जनता पक्षात गुणवत्तेला स्थान आहे. परिवार वाद, जातीयवाद आणि लांगुनचालन करणारा पक्ष नाही. 
7 करोड लोकांचे बँकेत खाते
भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर 7 करोड लोकांचे बँकेत खाते काढले. आम्ही वचनबद्ध आहोत, गरीबांच्या कल्याणासाठी, देशाच्य सुरक्षतेसाठी आणि भारताच्या सन्मानासाठी एप्रिलमध्ये निवडणुका होतील. देश कुणाच्या ताब्यात द्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे. मी तीनच मुद्यावर बोलणार आहे. 1. गरीबी, 2. सुरक्षा, 3. सन्मान.

भाजपने मताचं राजकारण केलं नाही. 7 करोड लोकांचे बँकेत खाते काढले. कारण त्यामुळे भ्रष्टाचार बंद झाला. 6 करोड परिवाराला गॅस सिलेंडर दिले. 2022 पर्यंत सर्व घरात गॅस सिलेंडर असेल. काय अवस्था होतील खेड्याची. झोपडीत धुरच धुर. हे चित्र बदलायचा प्रयत्न केला आहे. 
9 करोड घरामध्ये शौचालय नव्हते. हे सांगून त्यांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण सांगितलं आणि 8 करोड घरात शौचालय केल्याचं सांगितलं. इ.स. 2022 पर्यंत सर्वांना घरे देणार.
समस्यामुक्त भारत
भारत देश समस्यामुक्त असला पाहिजे, हे मोदीजींच स्वप्न आहे. एखाद्या गरीबाला कॅन्सर, लकवा असले आजार झाले तर वृद्ध म्हणतात, चला घराकडे. 5 लाख लोकांपर्यंत ही योजना पोहंचवलेली आहे. गरीबाप्रती संवेदना असलेलं भाजपच सरकार आहे.
निवडणुका झाल्या की लोक म्हणायचे, की गावचा विकास होणार की शहराचा. शेतकर्‍यांचा विकास होणार की उद्योजकांचा. गरीबांचा विकास होणार की श्रीमंताचा. नेता राज्य करणार की नोकरशहा राज्य करणार. हे सर्व करत असतांना आर्थीक शिस्त न मोडता मोदी सरकारने निर्णय घेतले आहेत. हे सांगून अमित शहा म्हणाले की, 5 वर्षातील विदेश निधीचा विचार करा. आपलं सरकार हे सीमेच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड करत नाही. शेजारी राष्ट्राबरोबर चांगले संबंध राहावे हा प्रयत्न आहे. विनाकारण भारताच्या झोपलेल्या सैनिकांना जाळून मारलं यावर पंतप्रधानांनी सांगितलं, याचा बदला घ्या आणि सर्जिकल स्ट्राईक घडलं. राहुलबाबा म्हणतात की, सर्जिकल स्ट्राईकमुळे काय झालं. ईटालीयन चष्मा निकालके देखो... फिर समझमें आयेगा... सामनेसे गोली आई तो गोला फेको... ईट का जबाब पत्थर से दो.... ही भूमिका आपली आहे. 

देशाच्या गौरवाची गोष्ट म्हणजे, नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. ज्यांचं आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उद्घाटनाचं भाषण झालं हा सन्मान उगीच मिळत नाही. जगात देशाचा सन्मान वाढवला हे सांगत असतांना महाराष्ट्रातील जलयुक्त शिवाराची कामे आणि अजित पवारांच्या काळात जलसिंचनात घोटाळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 129 योजना मंजूर केल्या. 5 वर्षात 30 पेक्षा जास्त मोठे क्रांतीकारक निर्णय घेतले हे सांगत असतांना 2019 मध्ये देशाला कुण्या दिशेला घेवून जायचंय हे तुम्ही ठरवा. 

पॉलटीक्स फिजिक्स नही केमीस्ट्री होती है
पॉलटीक्स फिजिक्स नही केमीस्ट्री होती है हे सांगतांना कायदा आहे. 18 वर्षाची मुलगी, 21 वर्षाचा मुलगा म्हणजे 1-1 वर्षाचे 21 मुलं आठरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही. अशा छोट्या छोट्या पार्ट्यानी देश चालत नसतो.

आंतराळात, आकाशात, पाण्यात, पातळात घोटाळा
काँग्रेसच्या काळात आंतराळात घोटाळा, आकाशात घोटाळा, पाण्यात घोटाळा, पातळात घोटाळा. जो कोळसा चोरी करत नाही पण या काँग्रेसवाल्यांनी कोळशातसुद्धा चोरी केली असा घणाघाती आरोप अमितजी शहा यांनी केला.

राफेल मेंफुटी कवडी का भ्रष्टाचार नही
राफेलमध्ये एक पैशाचा घोटाळा नाही, खोटं बोलायचं, जोरानं बोलायचं, पुन्हा पुन्हा बोलायचं ही काँग्रेसची भूमिका आहे. म्हणून लातूरकरांनो सावधान.... 18-18 तास काम करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदीला साथ द्या. जाती-पातीचं राजकारण न करता भाजप निर्णय घेत आहे. 18-18 तास काम करणार्‍या पंतप्रधानांना साथ द्या. तुम्ही मूकनायकाची भूमिका न घेता, गरीबांना सन्मान, देशाची सुरक्षा आणि विकासाचा वेग वाढवण्यासाठी फिर एक बार मोदी सरकार. या भूमिकेतून फक्त मतदार न राहता विकासाचे शिल्पकार बना अशी भूमिका अमितजी शहा यांनी मांडली.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील म्हणाले की, लातूर हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण शहर आहे. येणार्‍या निवडणुकीत तुम्ही आमच्याकडे पहा पाच वर्षे आम्ही तुमच्याकडे पाहतोत. प्रास्ताविकात पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, लातूरचा सन्मान म्हणजे इथले शेतकरी, इथले व्यापारी आणि इथले विद्यार्थी आहेत आणि जाणीवपूर्वक आपल्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय अध्यक्ष याठिकाणी आलेले आहेत. पाहुण्यांचे स्वागत शैलेश लाहोटी, नागनाथ निडवदे, महापौर सुरेश पवार, गुजराती मित्र मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. आभार शैलेश लाहोटी यांनी मानले

No comments:

Post a Comment