लातूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवार दि. 6 जानेवारी रोजी क्लसटर लोकसभा बैठकीच्या निमित्ताने लातूर शहरात येत आहेत. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनात लातूर भाजपाच्यावतीने संपूर्ण शहरात एक लक्ष पक्षध्वज, होर्डींग्ज, स्वागत कमानी उभारुन लातूर भाजपम करण्यात येत आहे.
लातूर, नांदेड, उस्मानाबाद व हिंगोली या चार लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा अमित शहा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लातूर शहर सजले, नटले असून पक्षाच्यावतीने जय्यत तयारी केली जात आहे.
क्लसटर लोकसभा बैठकीच्या अनुषंगाने चार जिल्ह्यातील जवळपास सहा हजार पदाधिकारी लातूरला येणार आहेत. शहरातील थोरमोटे लॉन्स याठिकाणी दि. 6 जानेवारी रोजी दोन सत्रात भाजपा पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. पहिल्या सत्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख हे पहिल्या सत्रात पदाधिकार्यांशी संवाद-चर्चा करतील. त्यानंतर संघटनात्मक बैठकीत अमित शहा बुथ रचनेचा आढावा घेतील, पदाधिकार्यांशी संवाद साधतील आणि त्याचठिकाणी आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने उपस्थित पदाधिकार्यांना कानमंत्र देवून विजयाचा संकल्प केला जाणार आहे.
चार जिल्ह्याच्या क्लसटर बैठकीच्या निमित्ताने अमित शहा यांचा दौरा यशस्वी करण्याच्या दृष्टीने तसेच चार जिल्ह्यातून येणार्या पदाधिकार्यांची गैरसोय होवू नये म्हणून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विशेष लक्ष घातले आहे. थोरमोटे लॉन्स या कार्यक्रमस्थळी सुक्ष्म नियोजन केले जात आहे. लातूर भाजपचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होवून राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौर्यानिमित्त लातूर भाजपमय करा अशा सूचना दिल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पक्षध्वज डौलाने फडकत आहेत. प्रमुख चौकात मोठे होर्डींग्ज लातूरकरांचे लक्ष वेधत आहेत. लातूर जिल्ह्यात मागच्या चार वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त करुन दिले. त्या यशाचा विचार करुनच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्याची सुरुवात लातूरपासून होत आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत लातूरला बैठक होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि प्रसार माध्यमांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. अमित शहा कोणता कानमंत्र देतात याबाबत पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. शहरांच्या दौर्यातून पक्ष कार्यकर्त्यांत नवचैतन्य आणि ऊर्जा प्राप्त होईल असे बोलले जात आहे. या ऊर्जेच्या माध्यमातूनच संपूर्ण मराठवाड्यातून लोकसभा निवडणुक जिंकण्याचा निर्धार केला जाईल.
अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार्या क्लसटर बैठकीचे संपूर्ण नियोजन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कुशल मार्गदर्शनात केले जात आहे. या बैठकीच्या निमित्ताने अवघे लातूर भाजपमय होत आहे. निश्चितच अमित शहांच्या दौर्याकडे समसत लातूरकरांचे लक्ष लागले आहे. दि. 6 जानेवारी रोजी क्लसटर बैठकीचे दोन्ही सत्र आटोपल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सायंकाळी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात निमंत्रित लातूरकरांशी संवाद साधणार आहेत. सन 2014 ते 2019 नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कामगिरी आणि सन 2019 ते 2024 आगामी काळात करावयाचे संकल्प, दिशा, धोरणे यासंबंधी अमित शहा भूमिका मांडतील. एकूणच शहांच्या दौर्याची जय्यत तयारी केली जात आहे.
No comments:
Post a Comment