तातडीने लागू होणार सवर्णांना आरक्षण : मुख्यमंत्री

Tuesday, January 15, 2019
मुंबई :- केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात देशातील आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानुसार गुजरातने लगेचच सोमवारपासूनच आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 


आता महाराष्ट्रातही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत विचार सुरू झाला असून या निर्णयाचे विधेयक विधिमंडळात आणायचे की थेट अधिसूचना काढायची याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी विधी व न्याय विभाग अभ्यास करत आहे. महाराष्ट्रात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्याने हा निर्णय देशभरासाठी लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुजरातने लगेचच हा निर्णय लागू केला जात असल्याची घोषणा करत अन्य राज्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे. केंद्र शासनाने दिलेले आरक्षण समांतर स्वरूपाचे व उमेदवाराला एकाच निर्णयाचा लाभ घेता येणार असल्याने अन्य आरक्षणाला धक्का लागणार नाही. 

No comments:

Post a Comment