‘एअर इंडिया’ राज्य सरकार विकत घेणार ?

Tuesday, January 15, 2019


आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाने त्यांच्या देशभरातील अनावश्यक असलेल्या इमारतींची विक्री सुरू केली आहे. त्यामध्ये कंपनीचे मुख्यालय असलेल्या मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील टोलेजंग इमारतीचाही समावेश आहे. या इमारतीच्या खरेदीसाठी आता राज्य सरकारने रस दाखवला आहे. 
मुंबईत उद्यापासून देशातील पहिली ग्लोबल अॅव्हिएशन परिषद सुरू होत आहे. त्यासाठी चौबे आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'मटा'ने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही इमारत खरेदी करण्यासाठी अनेकांनी रस दाखवला. पण आता आम्हाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र आले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारही इमारत खरेदी करण्यास उत्सुक असल्याने आता त्यादृष्टीने विचार सुरू केला आहे. राज्य सरकारने अद्याप आर्थिक प्रस्ताव दिलेला नाही. पण हे पत्र आठवडाभरापूर्वीच आले आहे. आता लवकरच आर्थिक वाटाघाटीसंबंधी चर्चा सुरू करू.

No comments:

Post a Comment