हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोली लोकसभेचे खासदार राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलु कामगिरी बद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहिर झाला असून बुधवारी दि. 19 जानेवारी रोजी तामीळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्यावतीने 2009 पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना हा पुरस्कार देण्यात येतो. खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थीती यासंदर्भात पीआरएस इंडीयाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मुल्यांकन निवड समिती मार्फत केली जाते. दरवर्षी लोकसभेच्या सभागृहात अष्टपैलु कामगिरी बजावणार्या खासदारांची निवड करण्यात येते. यंदाच्या या पुरस्कारासाठी खा.राजीव सातव यांची निवड करण्यात आली आहे.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन 2019 पर्यंत खा.सातवांनी 81 टक्के उपस्थीती लावत 117 वेळा चर्चेची सुरुवात,88 वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला तारांकीत व अतांराकीत असे 1075 प्रश्न उपस्थीत करुन 23 खाजगी सदस्य विधेयक देखील मांडले. या अष्टपैलु कामगीरीवरुन खा.राजीव सातव यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यासोबतच विविध गटातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे, शिवसेनेचे खा.श्रीरंग अप्पा बारणे यांची निवड करण्यात आली आहे.या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज आहिर,केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसुळ यांचा समावेश आहे.
तामिळनाडु येथील राजभवनात येत्या 19 जानेवारी रोजी ही पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. या पारितोषक वितरण सोहळ्यास तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री पी.पी चौधरी,आयआयटी मद्रासचे संचालक डॉ.भास्कर राममुर्ती, प्राईम पाइंटचे अध्यक्ष के.श्रीनीवास आदी मान्यवरांची उपस्थीती राहणार आहे.
देशात खा.सातव दुसर्या क्रमांकावर
लोकसभेतील 543 खासदारांच्या कामकाजाचे मुल्यांकनात हिंगोलीचे खा.राजीव सातव देशात आपल्या अष्टपैलु कामगिरीवरून दुसर्या क्रमांकावर असुन, सातव यांना 1215 अंक मिळाले असुन, पहिल्या क्रमांकावर 1272 अंक मिळवुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे तर तिसर्या क्रमांकावर 1211 अंक मिळवुन शिवसेनेचे खा.श्रीरंग अप्पा बारणे आहेत.
No comments:
Post a Comment