मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा मुलगा आकाश याचे लग्न श्लोका मेहता यांच्यासोबत ठरल्यानंतर अंबानी कुटूंब सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. मुकेश अंबानी हे रिलायन्स जिओ नेटवर्क लॉन्च केल्यानंतर तिरूपती येथील व्यंकटेश्वराच्या मंदिरात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनंत आणि ईशा अंबानी हे होते.
मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि ईशा अंबानी गुजरातमधील द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरातही जातात. ते वाराणसी येथील मंदिरातही जातात. मुकेश अंबानी हे नीता अंबानी यांच्या बर्थ डेच्या वेळी तेथे गेले होते.रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश आणि निता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते नेहमी बालाजीच्या मंदिरात जात असतात. त्यांनी तेथे पाढऱ्या हत्तीच्या मुर्त्या दान केल्या आहेत.

रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे आपला मुलगा जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी सोबत उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले होते. ते आपल्या 51 व्या जन्मदिनी महाकाल मंदिरात ‘भस्म आरती’त भाग घेण्यासाठी गेले होते.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी हे आंध्र प्रदेशातील श्रीकालाहस्ती मंदिरात जातात. हे शंकराचे प्रसिध्द मंदिर आहे.
जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदल हे त्यांची पत्नी संगीता जिंदल सोबत 2015 मध्ये केदारनाथला गेले होते.
आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल आणि त्यांची पत्नी उषा मित्तल सिध्दीविनायक मंदिरात पूजा करण्यासाठी जातात.
कुमार मंगलम बिर्लाची पत्नी आणि त्यांचा मुलगा आरिमन विक्रम बिर्ला सोबत अमृतसर स्थित दरबार साहेब येथे गेले होते. त्यांनी तेथे केवळ पूजाच केली नाही तर सेवाही केली.
No comments:
Post a Comment