मग मलाच का गोवले ? - एकनाथ खडसे

Monday, January 28, 2019



जळगाव - ईव्हीएम हॅकिंगची माहिती होती म्हणूनच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक आरोप हॅकर सय्यद शुजा याने अमेरिकेत केला तरीही भाजपने त्यावर विश्वास ठेवला नाही. 

मात्र, दाऊद इब्राहिमसोबत माझे संभाषण झाल्याचे हॅकर मनीष भंगाळे याने सांगितले तेव्हा कसा विश्वास ठेवला, असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांना केला.

भाजपच्या दुटप्पीपणावर त्यांनी या माध्यमातून बोट ठेवले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पत्रकार संघ व खान्देश नारीशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उदघाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment