लातूर, दि. २८ ः....
येथील ज्येष्ठ विधीज्ञ हरिश्चंद्र विठ्ठलराव पाटील रेड्डी यांचे दुःखद निधन झाले. अत्यंविधी मारवाडी स्मशानभूमीत दुपारी ५.३० वाजता करण्यात येणार आहे. दै. मराठवाडा नेता परिवार रेड्डी (पाटील) परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
लातूर येथे गेल्या ४० वर्षात आपल्या कर्तृत्वाने नावलौकीक प्राप्त केलेले हरिश्चंद्र रेड्डी हे अत्यंत शांत स्वभावाचे व मराठवाड्यात सुप्रसिद्ध विधीज्ञ म्हणून होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९६ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधिश १. नरेश पाटील, २. दिनेश पाटील, ३. विरेश पाटील हे तीन मुले आहेत. त्यांचं शिक्षण हैद्राबाद येथे झाले होते.
गेल्या कांही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवली सोमवार दुपारी ठीक ५.३० वाजता मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा स्वास्तिक गॅस एजन्सीजवळील त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून म्हणजे तहसील कार्यालयाच्या मागील घरापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निधनामुळे लातूरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक अभ्यासू विधिज्ञ हरवला आहे

No comments:
Post a Comment