न्यूझीलंडने दिलेले २४४ धावांचे आव्हान स्वीकारून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. ही जोडी भारतीय डावाची चांगली सुरुवात करून देणार असे वाटत असताना शिखर धवन २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेट्साठी ११३ धावांची भागिदारी रचली. डावाच्या २९ व्या षटकात रोहित शर्मा ६२ धावांवर बाद झाला.
त्यानंतर काही धावांची भर घालून विराट ६० धावांवर तंबूत माघारी परतला. सामन्यात न्यूझीलंडचा संघ कमबॅक करत असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी डावाची अधिक पडझड न होऊ देता भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेट्ससाठी ७७ धावांची अभेद्य भागिदारी रचली. अंबाती रायुडूने नाबाद ४० आणि दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावा पटकावत विजयात मोलाचा वाटा उचलला.
No comments:
Post a Comment