बुलंदशहर हिंसाचाराचा सूत्रधार योगेश राजला अटक

Friday, January 4, 2019


मिरुत (उत्तर प्रदेश): बुलंदशहर हिंसाचाराचा प्रमुख आरोपी योगेश राज याला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांनी यश आले आहे. हिंसाचाराच्या बरोबर 31 दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली. योगेश राज याच्यावर हिंसा भडकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बजरंग दलचा जिल्हा संयोजक योगेश राज हा हिंसाचाराच्या दिवसापासूनच फरार होता.
बुलंदशहराच्या बीबीनगर पोलिसांनी योगेश राजला रात्री साडे अकराच्या सुमारास अटक केली. खुर्जावरुन बुलंदशहरात येताना ब्रह्मानंद कॉलेजजवळ त्याला बेड्या ठोकल्या. योगेश राजच्या अटकेला उशिर होत असल्याने यूपी पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत होते. तत्पूर्वी, बुधवारी सतीश, विनित आणि अझर या तिघांनी स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले.

पोलीस योगेश राजला क्‍लीन चिट देण्याच्या तयारीत असल्याचेही म्हटले जात होते. याआधी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी प्रशांत नट आणि कलुआ या दोघांना अटक केली होती. पण पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये योगेश राज आरोपी क्रमांक एक आहे.

No comments:

Post a Comment