जिल्ह्यात दारूबंदी कुठेच दुसून येत नाही. उलट महाराष्ट्राव्यतिरिक्त तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश हरियाणा येथील विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच राज्य सरकारने विदेशी दारूवर १८ ते २० टक्के उत्पादन शुल्क वाढ व राज्यात १ हजार ५०० परमीट रूम उघडण्याची घोषणा करीत राज्याच्या महसुलात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी चंद्रपूर लिकर असोसिएशनचे सल्लागार दीपक जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.
जयस्वाल म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी होऊन सुमारे पावणे चार वर्षे पूर्ण झालीत. पण येथे दारूबंदी फसलेली आहे. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचप्रमाणे बनावटी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण ही बाब प्रशासनाने लपवून ठेवलेली आहे. त्याच जिल्ह्यात गांजा, अफीम, ब्राऊन शुगर पावडर याचे प्रमाण युवक वर्गात वाढले असून त्याला आळा बसणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासन आपले काम चोखपणे करीत असल्याचे सांगत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसती तर ठाणेदार छत्रपती चिडे यांची हत्या सुद्धा झाली नसती. याला सुद्धा दारूबंदीच कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment