तिरुवनंतपुरम (केरळ) : दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. ठिकठिकाणी वाहतुक रोखण्यात आली, रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि दगडफेकही झाली. या हिंसक आंदोलनादरम्यान भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाला. या हिंसाचारात 79 बसचे नुकसान झाले तर 31 पोलिस जखमी झाले. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
विविध हिंदुत्ववादी संघटनांची पालक संघटना असलेल्या शबरीमला कर्मा समिती आणि अंतराष्ट्रीय हिंदू परिषदेने संध्याकाळपर्यंत शबरीमला परीसरात पूर्ण बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यभर ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलने केली. सत्तारुढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची कार्यालये आणि वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. आंदोलनकर्ते कार्यकर्त्यांची पोलिस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर ठिकठिकाणी हिंसक बाचाबाची झाली. अशाच आंदोलनादरम्यान थ्रिसुरमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाला.
No comments:
Post a Comment