भाजपाध्यक्ष अमित शहा 6 जानेवारीला लातूरात

Wednesday, January 2, 2019
लातूर : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून प्रत्येक जागेला रिस्क न घेता योग्य उमेदवार आणि तो जिंकलाच पाहिजे या दृष्टीकोनातून अत्यंत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा लातूर जिल्हा दौरा निश्‍चित झाला आहे. 


साधारणतः अपेक्षित 2500 ते 2700 चार लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची ही बैठक असणार आहे. अशा पद्धतीची माहिती लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोलीचा काही भाग या लोकसभा मतदारसंघातील प्रमुखांना दिली असून युद्ध पातळीवर सुक्ष्म नियोजन केले जात आहे. 

अमित शहा यांचा हा लातूरला पहिलाच दौरा असून अत्यंत शिस्तप्रिय व चाणक्यनितीने काँग्रेसचे पानिपत करण्याच्या भूमिकेतून होणारे नियोजन उमेदवाराची निवड आणि थेट संपर्क, या सर्व हालचालींना वेग आला असून उमेदवार कोण असणार, कोण दिल्यावर योग्य राहील, या चार मतदारसंघात उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे आहे. आणि युती होवो किंवा न होवो, सर्व नियोजन करुन आखणी करण्याच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांचा दौरा हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. 

याचे सविस्तर वेळापत्रक हे आम जनतेसाठी जरी नसले तरी प्रमुख कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे आहे. या दौर्‍यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण होणार असून अमित शहा म्हणजे एक ऊर्जाकेंद्र म्हणून सगळेजण त्यांच्याकडे पाहतात आणि त्या पार्श्‍वभूमीवर हा दौरा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment