सरडे तेथे आला व त्याने संबंधित मुलीकडे टक लावून पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या मुलीने भावाला बोलावून घेतले. मात्र, सरडेने भावालाही मारहाण केली. त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना बोलावून घेतले. वडील व भावाने सरडेला पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Wednesday, January 2, 2019January 02, 2019
उस्मानाबाद : मुलीकडे वाईट नजरेने पाहनाऱ्यास सक्तमजुरी !

By Marathwada Neta
Wednesday, January 2, 2019
उस्मानाबाद : शाळकरी मुलीकडे वाईट नजरेने एकटक पाहिल्यामुळे तुळजापूर येथील एका टवाळखोराला विशेष सत्र न्यायाधीशांनी तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांवर जरब निर्माण झाली आहे.
तुळजापूर येथे ग्रामीण भागातून एक मुलगी शाळेसाठी येत होती. शहरातील बालाजी हरिश्चंद्र सरडे हा तिची सातत्याने छेड काढत होता. बसस्थानकावर तिच्याकडे एकटक बघून डोळ्यांनी अश्लील हावभावही करत होता. २० नोव्हेंबर २०१७ राेजी ही मुलगी मैत्रिणीसोबत सायंकाळी बसची प्रतीक्षा करत हाेती.
सरडे तेथे आला व त्याने संबंधित मुलीकडे टक लावून पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या मुलीने भावाला बोलावून घेतले. मात्र, सरडेने भावालाही मारहाण केली. त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना बोलावून घेतले. वडील व भावाने सरडेला पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सरडे तेथे आला व त्याने संबंधित मुलीकडे टक लावून पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या मुलीने भावाला बोलावून घेतले. मात्र, सरडेने भावालाही मारहाण केली. त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना बोलावून घेतले. वडील व भावाने सरडेला पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment