राष्ट्रभक्तीचा लातूर पॅटर्न प्रचंड उत्साह, जल्लोष वातावरणात सर्वात उंच झेंडा फडकला

Friday, January 18, 2019

लातूर : लातूर हे फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर निर्माण करणारे शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने राष्ट्रभक्तीचा आदर्श घ्यावा अशाप्रकारचं मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज आज जिल्हा क्रिडा संकुलावर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते फडकला.


जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर व कुशल संघटक अरविंदभैय्या निलंगेकर व लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नियोजनात अभूतपूर्व देखणा, दृष्ट लागण्यासारखा हजारो युवक व नागरीकांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा सोहळा सकाळी 9.15 वाजता स्टेडीयम विद्यार्थ्यांनी फुलले होते. प्रथमच राजीव गांधी चौक ते स्टेडीयमपर्यंत तिरंगा ध्वज दिसणारे मोठे मोठे फुग्यांचा ध्वज करण्यात आला होता. काल लातूर शहराच्या इतिहासात प्रथमच गल्लीबोळात युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात 1 हजार दुचाकीस्वाराची रॅली काढण्यात आली होती. 

लातूर हे ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबवत असतांना सुवर्ण अक्षरानी नोंद व्हावा असा हा अडीच तासाचा सोहळा झाला. लोकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि आपला राष्ट्रध्वज, आपला स्वाभिमान... या भूमिकेतून सर्व लोकप्रतिनिधी याठिकाणी उपस्थित होते. या सोहळ्याच्या नियोजनाचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले आणि राष्ट्रभक्तीचा लातूर पॅटर्न हासुद्धा दृष्ट लागण्यासारखाच ठरला.
व्यासपीठाला लाल किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले होते त्या मुळे प्रत्येकाला वाटत होते की आपण दिल्ली येथील लाल किल्ल्यावर असल्याची भावना होत होती 

No comments:

Post a Comment