मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही संपवले जीवन

Saturday, January 19, 2019

लातूर: मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन जीवन संपवले. निलंगा लातुक्यातील मौजे निटूर येथे ही घटना घडली आहे.
 
निलंगा तालुक्यातील निटूर येथील नितीन सुभाष घोडके (३०) याने दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सायंकाळच्या सुमारास त्याच्या आई आशाबाई सुभाष घोडके (५०) यांना शेतात काम करत असताना समजली. मुलाच्या आत्महत्येने धक्का बसलेल्या आशाबाई यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने निलंगा तालुक्यात खळबळ उडाली

No comments:

Post a Comment