पाण्यात बुडून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Friday, January 11, 2019



भोकरदन :- यात्रेहून आल्यानंतर शेतात बकऱ्या चारण्यासाठी नेल्या. परंतु बकऱ्यांना चारत असताना एका बकरीचे पिल्लू विहिरीत पडले. त्या पिलाला वाचवताना पाण्यात बुडून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील वाडी (बु) येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. नकुल शालीकराम ठाले (१५) असे मृताचे नाव आहे. 

त्या कुटुंबात तो एकुलता एक मुलगा होता. वाडी बुद्रुक येथील नकुल शालीकराम ठाले हा मंगळवेढा यात्रोत्सवातून घरी आला होता. यानंतर तो बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेला. बकऱ्या चारत असताना बकरीचे एक पिल्लू विहिरीच्या काठावर जाऊन विहिरीत पडले. पिल्लू विहिरीत पडल्याचे लक्षात येताच नकुल विहिरीत उतरला. पिलाला वाचवताना तोल जाऊन तो पाण्यात पडला. 

मात्र पोहता येत नसल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला असता, गावात माहिती दिली. यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढून भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला.

No comments:

Post a Comment