बायको शिवसेनेसारखी हवी, लफडी कळली तरी सोडत नाही - नितेश राणे

Tuesday, January 1, 2019




मुंबई : “असंख्य नवरे म्हणत असतील, बायको शिवसेनेसारखी हवी, लफडी कळली तरी सोडत नाही, जास्तच जास्त तर काय, एक सामनातून अग्रलेख, बाकी संसार सुरु”, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

सेना – आणि भाजप यांच्यातील संबंध सध्या सर्वश्रुत आहेत. राज्य आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेले हे दोन्ही पक्ष रोज एकमेकांवर दुगाण्या झाडत असतात. वेळ पडल्यास स्थानिक पातळीवर भलत्याच पक्षाशी युतीही करतात. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून तर दररोज भाजपला झोडपण्यात येत असते. मात्र भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत देण्यात येत नाही.

No comments:

Post a Comment