काँग्रेसला हल्ली शरद पवारांसारखा वकील मिळाला ! मुख्यमंत्र्यांची टीका

Tuesday, January 1, 2019

मुंबई : काँग्रेसला हल्ली शरद पवारांसारखा वकील मिळाला आहे. ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे हे पवारांनाही माहिती आहे. मात्र आता काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राफेल खरेदीवरून आरडाओरड करणारे आता गप्प का आहेत? काँग्रेसने या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील कथित मध्यस्थ ख्रिस्तिआन मिशेल याच्या चौकशीत इटालियन लेडी, मिस्टर आर यांचा उल्लेख आला आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने दिल्लीतील न्यायालयात दिली होती. हे दोन्ही उल्लेख थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करतात.

या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून मिशेलच्या साक्षीत सोनियांचे नाव येणे, हा कटाचा भाग असल्याचे प्रशस्तीपत्र शरद पवार यांनी रविवारी अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत दिले होते. आज सोमवारी यासंदर्भात प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद घेण्याचे आदेश भाजपचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर हल्ला चढवला

No comments:

Post a Comment