पाणजू बेटा नजीक समुद्रात बेकायदेशीररित्या जाणा-या 6 बोटींचा पाठलाग करून दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील 14 संशयिताना पकडण्यात कोस्टगार्ड कमांडर विजय कुमार व त्यांच्या टीमला यश आले आहे. 4 बोटी व त्यातील माणसे पळून गेली. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळाली नसल्याने तसेच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशीय असल्याच्या संशयावरून कोस्टगार्डने त्यांना वसई पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
देशाला समुद्री मार्गाने धोका असल्याने डहाणू येथे कोस्टगार्डने उभारण्यात आलेल्या तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम केले जात आहे. कोस्ट गार्ड, पोलीस, कस्टम आदी विभागांतर्गत शनिवारी कमांडर एम विजयकुमार, कमांडंट आर श्रीवास्तव “एच 194″ह्या बोटीद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवित होते. सकाळी 11.30 वाजता पाणजू बेटा नजीक 6 बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. पाठलाग करुन 2 बोटी कोस्ट गार्डने ताब्यात घेतल्या. मात्र अन्य 4 बोटी खाडीच्या बाजूला असलेल्या तीवरांच्या बाजूला किनाऱ्यावर लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात गायब झाले.
No comments:
Post a Comment