लोकसभा व विधानसभा निवडणुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढवणार आहे. लोकसभेच्या किती जागा लढविणार हे आचारसंहिता लागल्यावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी सांगितले. लाईफटाईम हॉस्पिटलच्या आॅडिटोरियममध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खा. नारायण राणे बोलत होते. यावेळी स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, प्रभारी जि.प. अध्यक्ष रणजित देसाई, स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ न.पं. माजी नगराध्यक्ष विनायक राणे, सभापती जेरॉल फर्नान्डीस, संतोष साटविलकर आदी उपस्थित होते.
मी लोकसभा निवडणुक लढणार की नाही, याचा निर्णय अद्याप झाला नसून तो निर्णय निवडणुक लागल्यानंतर जाहीर करण्यात येईल. मी भाजपसोबत आहे. मात्र भाजपने शिवसेनेसोबत युती केल्यास भाजपसोबत रहाणार नाही असे यापूर्वीच जाहीर केले आहे. माझा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुक लढविणार, कोणासोबत जाणार नाही, असेही मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मी जोपर्यंत एनडीएचा पाठिंबा काढून घेत नाही तो पर्यंत एनडीएत आहे, असेही खा. नारायण राणे म्हणाले.
No comments:
Post a Comment