दीपिका कक्कड ठरली 'बिग बॉस 12' ची वीजेती!

Monday, December 31, 2018

सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कलर्स वाहिनीवरच्या 'बिग बॉस 12' च्या विजेत्याची अखेर घोषणा झालीय. दीपिका कक्कड इब्राहिम बिग बॉसची विजेता ठरली. 30 डिसेंबरच्या रात्री झालेल्या एका रंगारंग कार्यक्रमात बिग बॉस सलमान खानने दीपिकाच्या नावाची घोषणा केली.

रविवारी झालेल्या खास कार्यक्रमात जेव्हा शेवटचा क्षण आला तेव्हा सर्वांची उत्कंठा शिगेल पोहोचली होती. आपल्या खास स्टाईलने सलमान खानने त्यात आणखी उत्सुकता निर्माण केली. श्रीशांत की दीपिका असा खेळ सलमानने बराच वेळ केला आणि शेवटी दीपिकाच्या नावाची घोषणा त्याने केली आणि बिग बॉसचा 12वा सिझन संपला.

No comments:

Post a Comment