ग्राहकांना नव्या वर्षाची भेट, गॅसच्या किंमतीत मोठी कपात

Tuesday, January 1, 2019

अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अनुदानित सिलेंडर 5 रुपये 91 पैसे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 120.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.
मुंबईत सध्या अनुदानित सिलेंडरची किंमत (14.2 कि. ग्रॅ.) 498.57 रुपये आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 780.50 रुपये आहे. नवे दर लागू झाल्यानंतर अनुदानित सिलेंडर 492.66 रुपयांना मिळेल, तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 660 रुपये असेल.

गेल्या महिन्यात अनुदानित गॅस सिलेंडर 6.52 रुपये, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झालं होतं. सलग दुसऱ्यांदा दिलासा देत पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment