टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच कसोटी सामन्यात दणदणीत मात देत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने यजमानांवर ३१ धावांनी विजय मिळवला.
विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांत आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे कांगारुंची झुंज अपयशी ठरली आणि भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयाच्या निमित्ताने परदेशात जाऊन पराभूत होणारा संघ, अशी असलेली प्रतिमा मोडित काढण्याची संधीही टीम इंडियाला मिळाली आहे.
No comments:
Post a Comment