लोहा दि प्रतिनिधी :
भाजप आणि काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेची केलेल्या लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले असून लोह्यातील जनतेने काँग्रेस चा सुफडासाफ करून अखेर प्रताप घडविला आहे या ठिकाणी १७ पैकी १३ जागा जिंकून भाजपाची एकहाती सत्ता स्थापन करण्यात आ प्रताप पाटील चिखलीकर यांना यश आले आहे .
लोहा नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी दि ९ डिसेंबर रोजी मतदान झाले आ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढविली तर काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही हि निवडणूक प्रतिष्टेची केली होती त्यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन केले होते परंतु मतदारांनी त्यांचे आवाहन झुगारून आ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला हेच आजच्या निकालावरून स्पष्ट होते .
एकूण १८ जागांसाठी काल मतदान झाले आज सकाळी १० वा मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली अवघ्या काही वेळात निकाल समजू लागले १८ पैकी १३ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले या शिवाय नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे गजानन सूर्यवंशी हे विजयी झाले त्यांना ८३६१ मते प्राप्त झाली त्याचे प्रतिस्पर्धी काँगेसचे उमेदवार सोनू संगेवार ५०९९ मतावर समाधान मानावे लागले अशा रीतीने भाजपने लोहा नगर पालिकेवर भाजपने एक हाती विजय मिळविला आहे आ प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर भाजप पक्षश्रेष्टीच्या मार्गदर्शनात लोहा कंधार विधानसभा मतदार संघात विविध विकास कामासाठी कोट्यवधींचा निधी आणला मतदार संघातील मतदारांशी डोअर तो डोअर संपर्क साधून जनमानसात स्वच्छ प्रतिमा निर्माण केली मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आजच्या निकालाने कामाची पावती दिली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment